✍️लोकवाणी आवाज
📝 ५ डिसेंबर २०२५
गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. योग्य प्रशिक्षण, सुरक्षा आणि मानधनासह रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
प्रशिक्षण दोन ट्रेडमध्ये दिले जाणार आहे —
बार बेंडिंग
शटरिंग
प्रशिक्षण कालावधी व सुविधा
45 दिवस ऑफ-साइट प्रशिक्षण
45 दिवस ऑन-साइट प्रशिक्षण
राहण्याची आणि जेवणाची सोय मोफत
प्रति महिना ₹5000 मानधन
प्रशिक्षण केंद्रांची निवड
उमेदवारांना प्रशिक्षण केंद्र निवडीची संधी दिली जाणार आहे.
LT Gondwana Camp, हेडरी
लॉयड्स स्किल अकॅडेमी, गडचिरोली
पात्रता व आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक पात्रता: किमान 5वी पास ते 12वी
वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे
मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
3 पासपोर्ट फोटो
शाळा सोडल्याचा दाखला / मार्कशीट
पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट
जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन येथे मुलाखती
मुलाखतीची वेळ: सकाळी 10 ते दुपारी 2
पेरमिली – 09/12/2025
धानोरा – 09/12/2025
भामरागड – 10/12/2025
येरकड – 10/12/2025
रेपनपल्ली – 11/12/2025
मुरुमगाव – 11/12/2025
जिमलगट्टा – 12/12/2025
सावरगाव – 12/12/2025
सिरोंचा – 13/12/2025
गट्टा (पेंढरी) – 13/12/2025
आसरल्ली – 15/12/2025
पेंढरी – 15/12/2025
मुलचेरा – 16/12/2025
कारवाफा – 16/12/2025
चामोर्शी – 17/12/2025
पोटेगाव – 17/12/2025
विशेष म्हणजे
आरमोरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
महत्वाच्या सूचना
प्रशिक्षणादरम्यान आवश्यक सुरक्षा उपकरणे कंपनीतर्फे दिली जातील.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना कंपनीची सहाय्यक संस्था LT Gondwana Skill Hub Pvt. Ltd., आलंदंडी येथे रोजगाराची संधी दिली जाईल.
ही योजना गडचिरोली जिल्ह्यातील पुरुष आणि महिलांसाठी उपलब्ध आहे.
संपर्क क्रमांक:- 9422304799

