आरमोरीजवळ खासगी ट्रॅव्हल्सचा एसटी बसला भीषण अपघात, 20 प्रवासी जखमी

Rambhau
0

आरमोरी तालुक्यातील चुरमुरा परिसरात एसटी बस आणि खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात

 ✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज)

  🌐 १९ जानेवारी २०२६

आरमोरीजवळ चुरमुरा परिसरात खासगी ट्रॅव्हल्सने एसटी बसला मागून धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त बस व घटनास्थळाचे दृश्य
आरमोरी तालुक्यातील चुरमुरा परिसरात खासगी ट्रॅव्हल्स व एसटी बसच्या अपघातानंतरची संयुक्त दृश्ये


लोकवाणी आवाज | प्रतिनिधी गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावानंतर आरमोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पहिल्या वळणाजवळ सोमवारी (दि. 19 जानेवारी 2026) सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स वाहनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला मागून धडक दिल्याने ट्रॅव्हल्समधील सुमारे २० प्रवासी जखमी झाले. मात्र, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


गडचिरोली येथून आरमोरी–कासवी–फरी–वडसा या मार्गावर प्रवासी घेऊन जाणारी एमएच-14 एलएक्स-5926 क्रमांकाची एसटी बस चुरमुरा गाव ओलांडून पुढे जात असताना समोरून येणाऱ्या दोन ट्रकांनी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. संभाव्य धोका ओळखून एसटी चालकाने बसचा वेग कमी करत ती डाव्या बाजूला घेतली.


याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एमएच-34 एबी-8320 क्रमांकाच्या खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकाने वाहन अतिवेगात व निष्काळजीपणे चालवत थेट एसटी बसला जोरदार धडक दिली. या धडकेत एसटी बसचे मोठे नुकसान झाले असून ट्रॅव्हल्समधील २० प्रवासी जखमी झाले.


अपघातानंतर जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


या प्रकरणी एसटी बसचे चालक शत्रुगण लहानुजी मगरे (वय ५०, रा. रामनगर वॉर्ड, गडचिरोली) यांनी आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरमोरी पोलीस ठाण्यात अप. क्र. 12/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 281, 125 (A), 125 (B), 324 (4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय चलाख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



आरमोरीजवळ अपघात नेमका कुठे झाला?
चुरमुरा गावानंतर आरमोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पहिल्या वळणाजवळ हा अपघात घडला.
या अपघातात किती प्रवासी जखमी झाले?
खासगी ट्रॅव्हल्समधील एकूण 20 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात जीवितहानी झाली आहे का?
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली आहे?
आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!