देसाईगंज तालुक्यात ग्राहक हक्क बळकट करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची नवी कार्यकारिणी
✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज)
🌐 १९ जानेवारी २०२६
![]() |
| देसाईगंज येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका कार्यकारिणी गठीत करताना नवनियुक्त पदाधिकारी व मान्यवर उपस्थित. |
देसाईगंज तालुक्यात ग्राहक हक्कांचे संरक्षण व जनजागृती अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. ही निवड जिल्हाध्यक्ष उदय धकाते यांच्या अध्यक्षतेखाली एकमताने करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत तालुकाध्यक्षपदी विलास ढोरे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून विनायक गरफडे यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सचिवपदी महेशभाऊ झरकर, सहसचिव म्हणून मनोज ढोरे तर कोषाध्यक्षपदी उद्धव डाबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला संघटन मजबूत करण्यासाठी महिला प्रमुखपदी पूजा पुस्तोडे तर सह महिला प्रमुख म्हणून वनिता अशोक नाकतोडे यांची निवड झाली. कायदेशीर मार्गदर्शनासाठी विधी प्रमुख म्हणून ॲड. संजय गुरु तर प्रचार प्रमुखपदी बारई सर यांची जबाबदारी देण्यात आली आहे. सदस्य म्हणून लोमेश्वर आंबेकर, आशा उईके व छाया विलास ढोरे यांचा समावेश आहे.
या वेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत गडचिरोली जिल्हा सचिव अरुण पोगळे, जिल्हा उपाध्यक्ष विजयभाऊ साळवे, जिल्हा महिला प्रमुख सुचिता धकाते तसेच निलिमा देशमुख उपस्थित होते. मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत ग्राहक संरक्षण, शोषणाविरोधात लढा आणि जनजागृतीसाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले.

