अडकलेल्या महाराष्ट्रातील १६४ नागरिकांना परतीचा मार्ग; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानांची व्यवस्था

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज टिम 

 📅 ३ मार्च २०२६

दुबईहून महाराष्ट्रातील नागरिकांच्या परतीसाठी विशेष विमानाचे प्रतिनिधिक छायाचित्र
प्रतिनिधिक छायाचित्र : दुबईत अडकलेल्या १६४ नागरिकांच्या परतीसाठी विशेष विमानाची व्यवस्था



मुंबई, ३ मार्च २०२६ : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्यपूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये महाराष्ट्रातील अनेक नागरिक अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री Eknath Shinde साहेब यांनी तातडीने पावले उचलत विशेष विमानांची व्यवस्था केली आहे.


या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधत सुरक्षित परतीबाबत आश्वासन दिले. संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधून परतीच्या उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे


   गडचिरोलीतील ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्पाची सविस्तर माहिती


आज फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विशेष विमाने उड्डाण घेणार आहेत. या उड्डाणांद्वारे एकूण १६४ प्रवासी महाराष्ट्रात परत येणार आहेत.


दुबईहून महाराष्ट्रातील नागरिकांच्या परतीसाठी विशेष उड्डाणे


VTGSO हे विमान दुपारी ३.३० वाजता तर VT GSH हे विमान सायंकाळी ४.३० वाजता टेकऑफ घेणार आहे. या दोन्ही विमानांमधून एकूण १६४ प्रवासी संध्याकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत मुंबई एअरपोर्टवर दाखल होणार आहेत.


या प्रवाशांमध्ये पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागांतील इतर नागरिकांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधत सुरक्षित परतीसाठी सर्व प्रयत्न केले जातील, असा शब्द दिला होता.


संबंधित यंत्रणांशी अखंड समन्वय साधून या १६४ प्रवाशांच्या परतीचा मार्ग मोकळा करण्यात आला असून नियोजित वेळेनुसार ते मुंबईत दाखल होणार आहेत.

दुबईत किती महाराष्ट्रातील नागरिक अडकले आहेत?
एकूण १६४ महाराष्ट्रातील नागरिक दुबई आणि यूएई परिसरात अडकले आहेत.
विशेष उड्डाण कुठून टेकऑफ घेणार आहे?
फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विशेष विमाने आज टेकऑफ घेणार आहेत.
विशेष विमानाची व्यवस्था कोणी केली?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी संबंधित यंत्रणाची समन्वय साधून विशेष विमानाची व्यवस्था केली.
या प्रवाशांमध्ये कोणाचा समावेश आहे?
पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड आणि अहिल्यानगर येथील नागरिकांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!