गडचिरोलीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची आढावा बैठक; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व नियुक्तीपत्र वितरण

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज टिम 

 📅 ११ मार्च २०२६

गडचिरोली येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची आढावा बैठक; मान्यवरांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती
गडचिरोली येथे झालेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आढावा बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते.



दिनांक 10 मार्च 2026 रोजी गडचिरोली येथे पोलीस स्टेशनच्या बाजूला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची आढावा बैठक पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली.


राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, मा. खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि श्री. मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.


संबंधित बातमी :
गडचिरोली दौऱ्यावर आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर; शिवसेना मार्गदर्शक मेळावा व नियुक्ती कार्यक्रम उत्साहात


बैठकीत मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत वैद्यकीय मदत कक्षाचे काम नेमके कसे चालते आणि गरजू लोकांपर्यंत मदत कशी पोहोचवायची याबाबत माहिती दिली. कार्यकर्त्यांच्या अडचणीही ऐकून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.


शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ देतानाचे क्षण.


कार्यकर्त्यांना वैद्यकीय मदत कक्षाच्या कामकाजाची माहिती


यावेळी वैद्यकीय मदत कक्षाच्या पुस्तकातील माहिती आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून विविध बाबी कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात आल्या. तसेच संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने काही कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.


या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून सत्यपाल कुत्तरमारे संपर्कप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गडचिरोली, संगिताताई राऊत महिला संपर्कप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, रमेश उप्पलवार गडचिरोली जिल्हा प्रमुख (शि.वै.म.क.), मनिकंठ गादेवार गडचिरोली जिल्हा प्रमुख (शि.वै.म.क.), यशवंत कत्रोजवार जिल्हा समन्वयक ((शि.वै.म.क.) उपस्थित होते.


हेही वाचा :
गडचिरोलीत शिवसेना (शिंदे गट) कडून शिवजयंती उत्साहात साजरी; जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रम


तसेच मोहम्मद दाऊद शेख उपजिल्हा प्रमुख, विकासभाऊ गराडे आरमोरी विधानसभा प्रमुख, रामकृष्ण बोरुले गडचिरोली तालुका प्रमुख, आयुष न्यालेवार तालुका प्रमुख गडचिरोली, मेश्राम तालुका प्रमुख अहेरी, हंसराज हिरापुरे तालुका प्रमुख आरमोरी, चेतन सुरपाम तालुका प्रमुख, उसेंडी मॅडम धानोरा आणि अंकुश मंडलवार उपतालुका प्रमुख अहेरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गडचिरोली येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची बैठक कधी झाली?
ही आढावा बैठक 10 मार्च 2026 रोजी गडचिरोली येथे पार पडली.
या बैठकीचा मुख्य उद्देश काय होता?
बैठकीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कामकाजाची माहिती देणे तसेच कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामाबाबत मार्गदर्शन करणे हा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमात कार्यकर्त्यांना काय देण्यात आले?
या बैठकीत काही कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या पुस्तक व QR कोडद्वारे माहिती देण्यात आली.
बैठकीला कोणते प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते?
सत्यपाल कुत्तरमारे, संगिताताई राऊत, रमेश उप्पलवार, मनिकंठ गादेवार, यशवंत कत्रोजवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!