वैनगंगा नदीत दुर्दैवी घटना; गडचिरोलीतील कांता मोहुर्ले यांचा बुडून मृत्यू

Rambhau
0
✍️ लोकवाणी आवाज टिम 
📅१० मार्च २०२६

वैनगंगा नदीत बुडालेल्या कांता अनिल मोहुर्ले यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर नदीकाठी ठेवण्यात आला.
वैनगंगा नदीत बुडालेल्या कांता अनिल मोहुर्ले यांचा मृतदेह नदीकाठी वाळूवर ठेवलेला




पंकज येवले जिल्हा प्रतिनिधी :-  वैनगंगा नदी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून कांता अनिल मोहुर्ले (वय 35) रा. गडचिरोली यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

संबंधित बातमी: आरमोरी येथे एसटी बस आणि ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन सुमारे 20 प्रवासी जखमी झाले होते. अधिक माहिती येथे वाचा — आरमोरी येथे एसटी व ट्रॅव्हल्सचा अपघात; 20 प्रवासी जखमी


माहितीनुसार, कांता मोहुर्ले हे आपल्या परिवार आणि काही मित्रांसोबत सहज पार्टी करण्यासाठी गडचिरोली - चंद्रपूर रोड लगत वैनगंगा नदी परिसरात गेले होते. एकूण पाच जण त्या ठिकाणी आले होते. सुरुवातीला वातावरण निवांत आणि आनंदाचे असताना अचानक घडलेल्या या घटनेने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.

नदीत उतरल्यावर पाण्याची खोली अचानक जास्त असल्याने कांता मोहुर्ले यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडू लागले. ही बाब लक्षात येताच त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू केले.

वाचवण्यासाठी प्रयत्न; पण पाण्याची खोली ठरली अडथळा

वैनगंगा नदीकाठी बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर उपस्थित लोक आणि पोलीस
वैनगंगा नदीत बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर नदीकाठी बसलेले सोबतचे परिवार आणि उपस्थित लोक व पोलीस.



त्या ठिकाणी उपस्थित असलेले शामकांला सुकदेव किरणगे यांनीही नदीत उतरून त्यांना शोधण्याचा व वाचवण्याचा प्रयत्न केला. काही वेळ सर्वांनी मिळून प्रयत्न केले, मात्र त्या भागात पाण्याची खोली जास्त असल्यामुळे त्यांना यश आले नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी शोधकार्य करून नदीतून मृतदेह बाहेर काढला व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

 

हेही वाचा: पोर्ला येथे झालेल्या दुचाकी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना. अधिक वाचा — पोर्ला येथे दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू


या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कांता मोहुर्ले यांच्या पश्चात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना 13 आणि 16 वर्षांचे दोन मुलगे आहेत. या घटनेमुळे नातेवाईक आणि परिचितांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!