✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 २२ एप्रिल २०२६
![]() |
| शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे वसुंधरा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राचार्य व उपस्थित मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना |
शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे आज (२२/०४/२०२६) जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदाजी सातपुते होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राकेश करोडकर, डॉ. उईके सर, भूगोल विभागाचे प्रा. अनिल सुरणकर तसेच प्रा. कु. मुनघाटे मॅडम उपस्थित होते.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी सक्ती; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
👉 पूर्ण माहिती वाचा
प्रास्ताविक करताना प्रा. अनिल सुरणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या काळात निसर्गाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरण यामुळे पर्यावरणाची घडी विस्कळीत होत असून पृथ्वीची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. नंदाजी सातपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रगतीच्या नावाखाली मानवाने सृष्टीचे स्वरूप बदलून टाकले आहे. हवा, पाणी, ध्वनी आणि जमिनीच्या प्रदूषणामुळे सजीवांच्या जीवनावर परिणाम होत आहे.
महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा 2026: 26 एप्रिलला परीक्षा, ऑनलाईन अर्जाची मुदत 13 फेब्रुवारीपर्यंत वाढ
👉 संपूर्ण बातमी वाचा
पुढे त्यांनी झाडे लावण्याचे, पावसाचे पाणी साठवण्याचे तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. विकासासोबत पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुरणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मुनघाटे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमात बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

