✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ०९ मे २०२६
![]() |
| पोरला येथील जि.प. उच्च श्रेणी प्राथमिक शाळेत ‘मावा नार, मावा शाळा’ उपक्रमांतर्गत बैठक घेऊन विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी अभ्यास वर्गाची माहिती देताना उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ. |
पोरला : गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ‘मावा नार, मावा शाळा’ उपक्रमांतर्गत पोरला येथील जि.प. उच्च श्रेणी प्राथमिक शाळेत 8 मे 2026 रोजी बैठक पार पडली. या बैठकीत इयत्ता 1 ली ते 4 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी अभ्यास वर्ग सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
पोर्ला अंगणवाडीत पोषण पखवाडा सुरू; गरोदर माता व किशोरी मुलींना मार्गदर्शन
पूर्ण बातमी वाचा
उन्हाळी सुट्टीत मुलांचा अभ्यास खंडित होऊ नये तसेच वाचन, लेखन आणि गणितातील मूलभूत तुट कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कमाल (TaRL) पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या स्तरानुसार भाषा आणि गणित विषय शिकविले जाणार आहेत.
या उपक्रमासाठी सरपंच निवृत्तताई राऊत, ग्रामसेवक निमगडे साहेब, पोलीस पाटील हितेंद्र बारसागडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामकृष्ण बोरुले, शाळा समिती उपाध्यक्ष तेजस्विनी भोयर, शाळा समिती सदस्य, उमेदच्या महिला, पालक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. बैठकीत उपक्रमाची माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.
मराठी उच्च प्राथमिक शाळेतच भरणार अभ्यास वर्ग
‘मावा नार, मावा शाळा’ उपक्रमांतर्गत पोरला येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ज्ञानकेंद्र व अभ्यास वर्ग भरविण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, अभ्यासाची आवड निर्माण करणे आणि भाषा-गणित विषय मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
शिवाजी महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
पूर्ण बातमी वाचा
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’, शिक्षण विभाग, ग्राम शिक्षण समिती आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येणार असून गावातील सुशिक्षित महिला आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा उरांडे यांनी उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.


