मौजा पोर्ला येथे अवैद्य देशी-विदेशी दारू व पावडर मिश्रित ताडीची जोमात विक्री; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष?

Rambhau
0

✍️ लोकवाणी आवाज टिम 

📅 १५ जून २०२६

पोर्ला गावात अवैध दारू व पावडर मिश्रित ताडी विक्री सुरू असल्याचा आरोप; कारवाईची मागणी प्रतिनिधी इमेज
पोर्ला येथे अवैध देशी-विदेशी दारू व पावडर मिश्रित ताडी विक्री प्रकरणाचे प्रतीकात्मक छायाचित्र


गडचिरोली जिल्हा ठिकाणापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा पोर्ला येथे देशी-विदेशी दारू व पावडर मिश्रित ताडीची मोठ्या प्रमाणात अवैद्य रीतीने विक्री जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र या अवैद्य दारू विक्री व ताडी विक्रीकडे गावातील पोलीस पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त समिती तसेच पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा गावात सुरू आहे.


गावात अवैद्य धंदे सुरू असताना पोर्ला येथील पोलीस पाटील यांच्याकडून पोलीस स्टेशनला याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या अवैद्य दारू विक्री व ताडी विक्रीला पोलीस पाटील सुद्धा जबाबदार असल्याचा आरोप होत असून, या भागातील बिट जमादार यांच्याही भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


📢 महत्वाची अपडेट:
रंगपंचमीआधी गडचिरोलीत अवैध दारूविक्रीवर कारवाई; १२ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

👉 पूर्ण माहिती वाचा


अवैद्य दारू विक्रीमागे नेमके कोणाचे अभय?


पोर्ला येथे सुरू असलेल्या अवैद्य दारू विक्री व पावडर मिश्रित ताडीच्या व्यवसायामागे नेमके कोणाचे अभय आहे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. गावात सुरू असलेल्या या प्रकाराबाबत संबंधित यंत्रणांना माहिती नसणे शक्य नसल्याची चर्चा असून, तरीही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


गावातील अल्पवयीन मुले सुद्धा या विषारी ताडी व विषारी दारूच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे युवा पिढीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाल्याचे सांगितले जात असून, गावात तंटे, वादविवाद आणि भांडणांचे प्रमाणही वाढल्याचे बोलले जात आहे.



नारायणपूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची धावपळ; हातपंप बंद असल्याने ग्रामस्थ त्रस्त

👉 संपूर्ण बातमी वाचा



महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अस्तित्व गावातील तंटे आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी असताना या गंभीर विषयावर समितीकडून कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचे दिसून येत नसल्याची चर्चा गावात आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.


पोर्ला गावातील अवैद्य दारू व ताडी विक्रेत्यांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून गावातील दारू विक्री बंद करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा पोर्ला गावातील नागरिक रस्त्यावर उतरून गावचे पोलीस पाटील, तंटामुक्त समिती व पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

सल्टिमेट इमेज



🌿 आयुर्वेदिक आरोग्यासाठी उपयुक्त उत्पादन

आयुर्वेदिक जीवनशैलीचा भाग म्हणून वापरले जाणारे हे लोकप्रिय उत्पादन सध्या आकर्षक ऑफरमध्ये उपलब्ध आहे.

.
पोर्ला येथे कोणत्या प्रकारची विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे?
पोर्ला येथे अवैध देशी-विदेशी दारू तसेच पावडर मिश्रित ताडीची विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात कोणाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत?
पोलीस प्रशासन, पोलीस पाटील तसेच संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अवैध दारू विक्रीमुळे कोणते परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे?
तंटे, भांडणे, कौटुंबिक वाद तसेच युवा पिढी दारूच्या आहारी जात असल्याचे सांगितले जात आहे.
नागरिकांची प्रशासनाकडे काय मागणी आहे?
अवैध दारू व ताडी विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करून हा प्रकार बंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!