✍️ लोकवाणी आवाज
🌐 गडचिरोली | 2026
![]() |
| शासकीय विभागातील विविध पदांसाठी आयोजित थेट मुलाखतीसाठी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थिती लावली. |
गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत विविध वैद्यकीय व अध्यापन संवर्गातील पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 198 रिक्त पदे भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कोणताही ऑनलाईन अर्ज न करता, थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. विशेष म्हणजे, सदर मुलाखती प्रत्येक आठवड्यातील बुधवारी आयोजित केल्या जाणार असून, पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
भरतीचे तपशील
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली
एकूण पदसंख्या : 198
नोकरीचे ठिकाण : गडचिरोली
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली
मुलाखतीचा दिवस : प्रत्येक आठवड्यातील बुधवार
पदानुसार रिक्त जागा
पदाचे नाव पदसंख्या
प्राध्यापक 17
सहयोगी प्राध्यापक 27
सहायक प्राध्यापक 41
शिक्षक / प्रदर्शक 25
वरिष्ठ निवासी 39
कनिष्ठ निवासी 48
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट 01
शैक्षणिक पात्रता
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून, याबाबतची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरात (PDF) मध्ये देण्यात आली आहे. उमेदवारांनी मुलाखतीस येण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
उमेदवारांसाठी सूचना
उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रती सोबत आणाव्यात
मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक
भरती प्रक्रिया पदे भरेपर्यंत सुरू राहील
महत्वाच्या लिंक्स
🔗 अधिकृत वेबसाईट :
https://www.gscgadchiroli.ac.in/
📄 PDF जाहिरात :
https://shorturl.at/zOT5H
ही माहिती तुमच्या मित्रांना आणि ओळखीच्या पात्र उमेदवारांना नक्की शेअर करा.
दररोज अशाच सरकारी नोकऱ्यांच्या मराठी अपडेट्ससाठी लोकवाणी आवाजला भेट देत राहा.
⚠️ टीप : ही बातमी माहितीच्या उद्देशाने देण्यात आली असून, अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी संस्थेची अधिकृत वेबसाईट व जाहिरात पाहावी.

