राज्यात “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन; गावापासून मंत्रालयापर्यंत आरोग्य व्यवस्थेवर राहणार थेट नजर

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज टिम 

📅 १५ मे २०२६


राज्यात “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन करण्याच्या निर्णयानंतर मंत्रालयात आरोग्य विभागाची बैठक पार पडली.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर मंत्रालयात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेताना


राज्यातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य स्तरावर “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या समित्यांच्या माध्यमातून आरोग्य संस्थांच्या कामकाजावर थेट लक्ष ठेवले जाणार असून स्थानिक स्तरावरील आरोग्य प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाणार आहे.


राज्य शासनाकडून सध्या एमआरआय, सिटी स्कॅन, डायलेसिस, स्टेमी प्रकल्प, टेलिमेडिसीन आणि जीवनदायी आरोग्य योजना यांसारख्या विविध मोफत आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानालाही या निर्णयामुळे आणखी गती मिळणार आहे.


ग्रामीण आणि शहरी भागात आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांसारख्या अनेक आरोग्य संस्था कार्यरत आहेत. रुग्णांना वेळेत सुविधा मिळाव्यात आणि आरोग्य यंत्रणेमधील अडचणी कमी व्हाव्यात यासाठी ही नवी समिती रचना लागू करण्यात आली आहे.

📢 महत्वाची अपडेट:
माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान सुरू; गावांना कोटींची बक्षिसे, आरोग्य सेवेला नवी दिशा

👉 पूर्ण माहिती वाचा


आमदार, पालकमंत्री आणि आरोग्य अधिकारी एकाच समितीत


ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील समितीचे अध्यक्ष संबंधित आमदार असतील, तर तालुका आरोग्य अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. समितीत खासदार, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी सहभागी राहणार आहेत.


महानगरपालिका क्षेत्रातील समित्यांमध्ये संबंधित आमदार अध्यक्ष असतील. त्यांच्यासोबत महापौर, उपमहापौर, आरोग्य समिती सभापती, खासदार, विधान परिषद सदस्य तसेच महिला व बाल विकास विभाग आणि शिक्षण विभागाचे प्रतिनिधीही असतील. जिल्हास्तर समितीचे अध्यक्ष संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, तर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिका आयुक्त समितीत सहभागी राहतील.


राज्यस्तरीय “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती”चे अध्यक्ष सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर असतील. आरोग्य राज्यमंत्री सह-अध्यक्ष म्हणून काम पाहतील. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी आणि शहरी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी समितीत सहभागी राहणार आहेत.


या समित्यांचे मुख्य काम म्हणजे आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करणे, नागरिकांच्या आरोग्य समस्या सोडवणे, विविध विभागांमध्ये समन्वय वाढवणे आणि गावपातळीपासून आरोग्य सेवा अधिक मजबूत करणे हे राहणार आहे. जन आरोग्य समिती, रुग्ण कल्याण समिती, महिला आरोग्य समिती तसेच ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता समित्यांच्या कामाचाही आढावा या समित्यांमार्फत घेतला जाणार आहे.

📢 महत्वाची बातमी:
पोर्ला अंगणवाडीत पोषण पखवाडा सुरू; गरोदर माता व किशोरी मुलींना मार्गदर्शन

👉 संपूर्ण बातमी वाचा


प्रत्येक समितीची दर तीन महिन्यांनी किमान एक बैठक घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. बैठकीत घेतलेल्या निर्णयांवर संबंधित अधिकाऱ्यांना ठराविक कालावधीत कार्यवाही करून अहवाल सादर करावा लागणार आहे. विधानसभा स्तरावरील समित्यांच्या कामाचा आढावा जिल्हास्तरावर घेतला जाणार असून जिल्हास्तरीय समित्यांच्या कामाचा आढावा राज्यस्तरावर घेतला जाणार आहे.


यामुळे गावपातळीवरील आरोग्य प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचणार असून आरोग्य यंत्रणेवर लोकप्रतिनिधींचीही नजर राहणार आहे. आरोग्य विभाग, प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट समन्वय वाढून आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबवण्यास मदत होणार आहे.




बीपी मॉनिटर इमेज

घरबसल्या BP तपासण्यासाठी डिजिटल मशीन

रक्तदाब नियमित तपासण्यासाठी अनेक जण डिजिटल BP मॉनिटरचा वापर करतात. घरबसल्या सहज वापरता येणारे हे मशीन ऑनलाइन उपलब्ध आहे.

62% OFF
₹1499 ₹577

✔ ₹50 पर्यंत UPI ऑफर
✔ EMI सुविधा उपलब्ध
✔ घरबसल्या BP मॉनिटरिंग

टीप: वरील लिंक affiliate link आहे.

👉 उत्पादन पाहा
“एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” म्हणजे काय?
राज्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि समन्वयातून चालवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली नवी समिती रचना आहे.
या समितीमध्ये कोण सहभागी राहणार आहेत?
आमदार, खासदार, पालकमंत्री, आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी समितीत सहभागी राहणार आहेत.
या समितीचे मुख्य काम काय असणार?
आरोग्य सेवांमधील अडचणी दूर करणे, नागरिकांच्या तक्रारींवर लक्ष देणे आणि गावपातळीवरील आरोग्य प्रश्न सोडवणे हे समितीचे मुख्य काम असणार आहे.
समितीच्या बैठका किती वेळा होणार?
प्रत्येक समितीची दर तीन महिन्यांनी किमान एक बैठक घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!